नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार दिवंगत वसंतराव पाटील चव्हाण यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने नायगाव शहरातील जय मल्हार हॉटेलचे मालक नारायण मामा यांचे नातू, खंडू नारायण चनेबोईनवाड यांचे चिरंजीव
आठव्या वर्गात शिकणारा विध्यार्थी माणिक खंडू चनेबोईनवाड यांनी दिवंगत पाटील यांची हुबेहूब फोटो काढून चव्हाण परिवाराला केले समर्पित केले असल्याने या विध्यार्थाचे सर्वत्र कौतुक होत आहे
लोकनेते मा.स्व खा वसंतरावजी पाटील चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त नायगाव शहरातील जय मल्हार हॉटेलचे मालक नारायण मामा यांचे नातू खंडू नारायण चनेबोईनवाड यांचे चिरंजीव माणिक खंडू चनेबोईनवाड इयत्ता ८ वी जनता हायस्कूल नायगाव यांनी आपल्या कलेतून साहेबांची हुबेहूब प्रतिमा स्वतःच्या हाताने साकारत अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे
माणिकने अत्यंत सुंदर जिवंत आणि मनाला भावणारे हे चित्र साकारले त्याची ही कलाकृती पाहून नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा. रविंद्रजी पाटील चव्हाण साहेब तसेच उपस्थित श्री. केशवरावजी पाटील, वसंतजी सावकार मेडेवार, माजी. मुख्याध्यापक श्री. ह. स. खांडगावकर सर, मेथे सर, श्री. कैलास सावकार कवटीकवर अन्य मान्यवरांनी, तसेच सर्व शिक्षक वृंद, आणि विद्यार्थी मित्र माणिकचे मनापासून कौतुक केले आणि त्याला प्रोत्साहन दिले.
या सृष्टीवर जन्मास आलेला मानव छोटा असो मोठा असो त्यांच्या तेजस्वी बुद्धी मधून एखाद्या महापुरुषाचे असो की नेत्याची असो जशास तसे चित्र उभारणारे जे कलाकार असतात जसे ते कॅमेरा प्रमाणे समोरच्या व्यक्तीचे छायाचित्र पेन्सिल असो की पेन हे हातात घेऊन त्यांच्या तेजस्वी बुद्धीतून सदरचे चित्र काढले जाते
एका छोट्या कलाकाराने आपल्या हातातील कलेतून एका मोठ्या लोकनेत्याला दिलेली ही मानवंदना निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे
तशाच पद्धतीने नायगाव शहरातील जय मल्हार हॉटेलचे मालक नारायण मामा यांचे नातू खंडू नारायण चनेबोईनवाड यांचे चिरंजीव माणिक खंडू चनेबोईनवाड यांचे नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून त्या मुलांच्या भावी कार्यासाठी त्यांचे हार्दिक अभिनंदन व कौतुक जिजाऊ नंदन स्वर संगीतचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार यांच्या करण्यात येत आहे

0 Comments