महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागात शांतता व सलोखा राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान १५ ऑगस्ट २००७ रोजी सुरू केली असली तरी या महात्मा गांधी तंटा मुक्त समितीला फार असे महत्व सध्या तरी उरले नसल्याचे ग्रामीण भागातील खेड्या पाड्यात दिसून येत आहे
राज्यात भारतीय युतीचे सरकार असल्यामुळे या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती मोहिमेला फार अस महत्व दिले जात नसल्यामुळे या समितीचा नुसता उघडा बोजवारा झाला आहे
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांनी त्यांचे सरकार राज्यात सत्तेवर असताना या मोहिमेची निर्मिती केली होती या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची स्थापना करण्यात आली होती
परंतु या समितीला काही महत्व उरले नसल्यामुळे गावातील छोटे-मोठे वाद परस्पर तड जोडीने मिटण्या ऐवजी थेट पोलीस ठाण्यात जात असल्याचे ग्रामीण भागात दिसून येत आहे

0 Comments