माजी मंत्री तथा माजी खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचा कुंटूर जिल्हा परिषद गट हा बाले किल्ला समजला जाणाऱ्या या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्या सौभाग्यवती दीपावली ताई शिवराज पाटील होटाळकर यांची जोरदार इंट्री या जिल्हा परिषद गटात झाली असल्यामुळे चांगलाच सामना रंगणार आहे
काही दिवसात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्यामुळे निवडणुकी मध्ये राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या सौभाग्यवती मधूमतीताई राजेश देशमुख कुंटूरकर विरोधात मा. शिवराज पाटील होटाळकर यांच्या सौभाग्यवती दीपालीताई पाटील होटाळकर अशी निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर सर्कल मध्ये जनतेच्या अपेक्षा नुसार विकास झाला नसल्यामुळे सदरचा गट हा विकासा पासून वंचित असल्याचे दिसून येत असून या जिल्हा परिषद गटातील विकास करण्यासाठी सौ दीपालीताई शिवराज पाटील होटाळकर यांनी कंबर खचली आहे
या सदरच्या गटात विकासची गंगा आणण्यासाठी व विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षा कडून पक्षा कडून उमेदवारी मिळणार असल्यामुळे ह्या गटात सदरची निवडणूक रंगणार आहे
राजकीय वर्तुळात राजकीय वादळ उठणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार पक्षाचे नांदेड दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषद कुंटूर गटात सदरची निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे

0 Comments