नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथे माजी मंत्री तथा माजी खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे चिरंजीव मा राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या कार्यकर्त्यानी लावलेले वाढदिवसाचे बॅनर गावातील कोणी तरी आज्ञात व्यक्ती कडून फाडून त्याची विटंबना केली गेली आहे
प्रकरणी गावचे माजी महिला सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी पोलीस अधीक्षक नांदेड यांच्यासह कुंटूर पोलिसात तक्रार देणार असल्याचे निलेश देशमुख यांनी सांगितले असून सदरच्या आज्ञात व्यक्तीचा शोध लावण्यासाठी तक्रार करण्यात येणार आहे
रुई बु येथे दिनांक २८ ऑगस्ट रोजी जयंती असल्यामुळे असा प्रकार घडू नये -:
सर्वात महत्वाची बाब म्हणजे दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती असल्यामुळे अशाच पद्धतीने बॅनर लावले जाणार आहेत असा प्रकार रुईत होऊ नये या साठी गावचे प्रथम नागरिक यांनी पोलीस अधीक्षक यांच्या कुंटूर पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे निलेश देशमुख यांनी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
तालुक्यातील कुंटूर येथील रहिवाशी असलेले माजी मंत्री तथा माजी खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचा या सदरच्या बॅनरवर फोटो असून सदरचे बॅनर हे मा. राजेश देशमुख कुंटूरकर यांचा वाढदिवस दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी असल्यामुळे आपल्या नेत्यांना भरघोस शुभेच्छा देण्यासाठी सदरचे बॅनर लावण्यात आले होते
घुंगराळा ते रुई बु बळेगाव रस्त्यावर म्हणजे गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर लावण्यात आले होते परंतु कोणी तरी आज्ञात व्यक्ती कडून गावातील प्रतिष्ठीत नगरीक निलेश देशमुख यांचा ही या बॅनरवर फोटो असल्यामुळे त्यांच्या नाकावर रिजेल पती मारून बॅनर फाडले व त्यांच्या बॅनरची विटंबना करण्यात आली आहे

0 Comments