नायगाव विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे -
मांजरम हुन धानोरा ता कंधार येथे जाणाऱ्या मोटार सायकल स्वारास भर रस्त्यात सायंकाळी साडेपाच च्या सुमारास अडवून काठ्यांनी मारहाण करीत चोरट्याने जवळचे पैसे व किमती वस्तू व कागदपत्र काढून घेतल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच च्या दरम्यान घडली.या मुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सदर जखमी युवकास नायगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या बाबद अधिक माहिती अशी की,मांजरम येथील माजी तंटा मुक्ती अध्यक्ष माधवराव माणिकराव शिंदे यांचे जावई माधव बालाजी जाधव रा.धानोरा ता कंधार हे ह.मुकाम नांदेड येथे राहतात आपल्या पत्नीस नांदेड हुन घेऊन येऊन आपल्या सासुरवाडी मांजरम येथे लक्ष्म्या साठी सोडून आपल्या आईला भेटण्या साठी मांजरम ता नायगाव येथून सायंकाळी पाच च्या दरम्यान मोटार सायकल क्र.एम एच २६ बी इ ६९७८ ने निघून मांजरम वाडी मार्गे धानोरा येथे जात होते.
नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे सदरची घटना कळताचा पोलीसच्या टीम घेऊन घटनास्थळी दाखल झाले असल्याचे नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
उन्हाची दाहकता व आगोदरच जंगल झाडी तुन असलेल्या रस्त्यात कोण्हीच नव्हतेअसे जाधव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले . अचानक दोन ते तीन महिला समोर येऊन जाधव यांना गाडी उभी करण्याचा इशारा करीत होत्या.त्यांच्याशी मराठी मधून संपर्क साधून बोलण्याचा प्रयत्न जाधव यांनी केला परंतु त्यांना मराठी व हिंदी कळत नव्हते असे ते म्हणाले तेवढ्यात पाठीमागून दोन ते तीन पुरुष येऊन काठीने पाठीत खुब्याजवळ जबर मारहाण केली यामुळे जाधव जाग्यावर कोसळले.नंतर मांडीवर काठीने मारहाण करीत सर्व साहित्य काढुन घेतले त्यात नगदी दहा हजार रुपयाच्या वर पैसे महत्वाची कागदपत्र,व मोबाईल होता.
सुदैवाने जाधव यांनी आरडा ओरड केल्याने चोरट्याने मोबाईल जागांवर फोडून पोबारा केला.घाबरलेल्या जाधव यांनी मांजरम ते वाडी रस्त्यावरच सासुरवाडीचे घर असल्याने कसेबसे घर गाठले.सासरा माधव शिंदे,व मनोज शिंदे यांनी तात्काळ आंबूलन्स करून मांजरम प्राथमिक आरोग्य केद्रात प्राथमिक उपचार करून नायगाव ग्रामीण रुग्णालयात आणले आहे
तेथे डाँ पोहरे यांनी नेहमीच्या सवयी प्रमाणे नांदेड जाण्या साठी सांगितले. उपचार होऊ न शकल्याने नातेवाईक घाबरले अचानकच ही माहिती कळताच नायगाव फास्ट न्यूजचे विशेष प्रतिनिधी बाळासाहेब पांडे दवाखान्यात आले व त्यांनी नातेवाईकांना बोनकेअर हॉस्पिटल येथे नेण्यास सांगितले रुग्णांना घेऊन बोनकेअर हॉस्पिटल नायगाव गाठले.नायगाव येथे डाँ.खान यांनी त्यांच्या रुग्णालयात उपचार केला.जखमी ची पृकृती स्थिर आसून रात्री उशिरा पर्यंत उपचार चालू होते घटनेचे वृत्त समजताच नायगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे हे रात्री उशिरा पर्यंत घटनास्थळी असंल्याची माहिती आहे.

0 Comments