Header Ads Widget

जनतेच्या मतावर राजकारण करणाऱ्यांनो मराठा समाजाला आरक्षण का ? नको तात्काळ आरक्षण द्या -

       माधव पवार 
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अनेक वर्षापासून प्रलंबित असताना सुद्धा या राज्यातील राजेकर्ते जनतेच्या मतावर निवडून येऊन सत्तेत बसतात परंतु मराठा समाजाला आरक्षणाची गरज असताना सुद्धा या आरक्षणाकडे सत्तेत बसलेले राजकारणी मराठा समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे मराठा समाजावर आज उपोषण करण्याची व आंदोलने करण्याची वेळ आली आहे

मराठा समाजाला २५ टक्के आरक्षण मिळावे यासाठी संसदेत कायदा करा अशी मागणी रामदास आठवले यांनी या परिषदेत केली नोव्हेंबर डिसेंबर इ. स. २०१८ मध्ये महाराष्ट्र सरकारने राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या १५% असलेल्या मराठा समाजाला १३% आरक्षण दिले होते तर मग दिलेले आरक्षण कुठे गेले असा सवाल ही जनता करीत आहे 

राज्याच्या राजकारणात सत्तेची उलथा पालथ करता येते तर मग मराठा समाजाच्या आरक्षणावर या राज्यातील तत्कालीन सरकार आणि सध्याचे सरकार का बोलत नाही असा प्रश्न जन सामान्य माणसाला भेडसावत असून ह्या राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांनी मोठा लढा उभारला होता

त्यावेळी सुद्धा आरक्षणाला सरकार दाद मिळून दिली नाही असे असताना सुद्धा राज्यातील कोणते ही सरकार असो मराठा समाजाच्या डोळ्यात धुळ फेकून राजकारण करत असल्याचे स्पष्ट चित्र पहावयास मिळते मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा केवळ निवडणुकीच्या तोंडावर मांडला जातो गोरगरीब जनतेच्या व मराठा समाजाच्या डोळ्यात धुळ फेकून हे राजकारणी निवडणुकीत निवडून येताना दिसून येत आहेत 

मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठे तरी टांगून ठेवत असल्याने ह्या राज्यात मराठा समाजाला न्याय मिळेल का ? असा ही प्रश्नच जन सामान्य माणसातून केला जात असला तरी राज्यातले सरकार येत्या आगामी काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज असून सरकारने मराठा समाजाच्या डोळ्याचे पाणी पुसण्याचे काम करण्या पेक्षा आरक्षण दिले पाहिजे हा या समाजाचा महत्वाचा प्रश्न आहे 




Post a Comment

0 Comments