Header Ads Widget

महाराष्ट्राचे वाळवंट होईल तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे शब्द खरे ठरत आहेत

              माधव पवार 
महाराष्ट्राचे वाळवंट होईल तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे शब्द आज खरे ठरत आहे 

त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत, प्रामुख्याने १९९१ ते १९९२ या काळात राज्यातील खालावत चाललेली भूजल पातळी आणि तीव्र दुष्काळी परिस्थिती पाहून हा विचार जाहीर पणे मांडला होता तेच त्यांचे शब्द व अर्थात इशारा खरा ठरत आहे 

राज्यातील हे दळभद्री सरकार दर वर्षी वृक्ष लागवडीची मोहीम काढतो व लागवड ही केली जाते मात्र आज पर्यंतच्या कार्यकाळात एक झाड जगलं नाही अथवा त्यांची जोपासना करण्यात आली नसल्यामुळे सर्वच झाडे वाळुन गेले आहेत 

सदरचे हे राज्यातील सरकार हे वृक्ष लागवडीच्या नावाखाली कोठ्यावधी रुपये खर्च करतो आणि तेच खडे मार्ग तेच आणि गुत्तेदार ही तेच अशा पद्धतीची वृक्ष लागवड करून सुद्धा झाडे जगवत नाही आणि हेच सरकार प्रकल्पाच्या नावाखाली वृक्ष तोडीची मोहीम हाती घेतल्यामुळे राज्यातील जनतेला चिंतेचा विषय बनला आहे 

जंगल क्षेत्राचे नुकसान: काही सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांच्या मते, या प्रकल्पासाठी शेकडो एकर वनक्षेत्रातील हजारो झाडांची कत्तल केली जात आहे,

ज्यामुळे सह्याद्रीची जैवविविधता आणि दुर्मिळ 'शेकरू' महाराष्ट्राचा राज्य प्राणीचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला असून तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी दिलेला इशारा आज खरा ठरत आहे 

Post a Comment

0 Comments