Header Ads Widget

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा भोंगळ कारभार रात्रीच्या वेळी खात्यात पैसे जमा असताना सुद्धा पैसे ट्रान्सफर होईनात !!

        माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कृष्णूर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा भोंगळ कारभार झाला असल्यामुळे सदरच्या बँक खात्यात पैसे खाते दाराचे जमा असताना सुद्धा रात्रीच्या वेळी पैसे ट्रान्सफर करत असताना खात्यात पैसे नाहीत असे दररोज दाखवीत आहे 

सदरच्या बँक खाते दाराला अचानक पणे दवाखान्याचे काम पडल्यास फार मोठया संकटाला सामोरे जावे लागत आहे 

तालुक्यातील कृष्णुर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे बॅलन्स चेक केल्याच्या नंतर अमाऊंट दाखविल्या जात असले तरी ते पैसे खात्यातुन ट्रान्सफर होत नसल्यामुळे सदरच्या खातेदाराला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

तालुक्यातील कृष्णुर महाराष्ट्र ग्रामीण बँक ही चांगल्या दर्जाची असल्यामुळे अनेक खातेदाराचे खाते या बँकेत आहेत 

व पैसे भरणे व पैसे उचलणे असे मोठाले व्यवहार असताना सुद्धा सदरच्या बँकेचा भोंगळ कारभार झाला असल्याने रात्रीच्या वेळेस पैसे ट्रान्सफर करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments