Header Ads Widget

कृष्णुर एमआयडीसीतील उद्योगांना चोरापासून संरक्षण मिळावे म्हणून पोलीस चौकी हुभारण्याची केदार पाटील सोळुंके यांची उदयजी सामंत यांच्या कडे मागणी

        माधव पवार 
नांदेड जिल्ह्यातील कृष्णुर येथे फाइव स्टार एमआयडीसी स्थापन करून मोठमोठे उद्योग निर्मिती व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील असताना येथे उभारण्यात आलेल्या उद्योगातून मोठ्या प्रमाणात चोऱ्या होतआहे

त्यामुळे येथील उद्योजक हतबल झालेला आहे त्यामुळे येथील उद्योगांना चोरापासून संरक्षण मिळण्याची मागणी केदार पाटील साळुंके यांनी उद्योगमंत्री मा ना उदयजी सामंत यांच्या कडे  केली आहे.
       
कृष्णुर एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग निर्माण होत आहेत मात्र येथे उद्योग निर्मिती होत असताना तेथील बांधकाम साहित्य सह अनेक वस्तू रात्रीला चोरी करून नेल्याजात आहेत तर अनेक उभारलेल्या  उद्योगातून मशीन चोरी, मोटारी व अन्य सामान चोरून घेऊन  जात आहेत

त्यासाठी येथे पोलीस स्टेशन किंवा पोलीस चौकी नसल्यामुळे येथील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण वाढत आहे अनेक वेळा पोलिसात तक्रार देऊनही त्याची चौकशी होत नाही असा निवेदनात आरोप करण्यात आला आहे

त्यामुळे येथील उद्योजक पूर्ण हतबल झालेला आहे त्यावर तातडीने कार्यवाही करून येथे पोलीस चौकी उभारून येथील उद्योगांना चोरापासून संरक्षण मिळवून देण्याची मागणी कृष्णुर् एमआयडीसी उद्योग विकास कृती समितीचे अध्यक्ष केदार पाटील साळुंके यांनी उद्योगमंत्री  उदयजी सामंत यांच्याकडे मुंबई येथे विधान भवननात जाऊन त्यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


Post a Comment

0 Comments