माधव पवार
नांदेड जिल्हासह ग्रामीण भागात चोऱ्या होत असल्याच्या अफवा आहे तिकडे पसरत असताना शहरी भागात गुंडगिरी करणाऱ्याला चांगलाच आला असल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील व शहरी भागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी गुंडगिरीला आळा बसविण्यासाठी नेहमी साठी प्रयत्नशील असतात परंतु वजीराबाद गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने एक गावठी पिस्तूल पकडून एका आरोपीला जेरबंद केले
जिल्ह्यात मोठया उत्साहाने गणेश उत्सव साजरा होत असल्यामुळे पोलिसांची करडी नजर गुंडवर्तीच्या लोकाकडे असल्यामुळे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निलेश मोरे, चंद्रसेन देशमुख, यांच्या सुचनेनुसार वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शननाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांच्या टीम मधील अधिकारी सपोनि दत्तात्रये निकम, पथकातील अंमलदार गजानन किडे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, विजय नंदे, संतोष बेलरोड, शेख इम्रान, रमेश सूर्यवंशी, व्यंकट गांगुलवार बालाजी कदम आदीने परिश्रम घेतले आहे
सदील पथकातील पोलिस अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निल पत्रे वार यांच्या पोलीस टीमने अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली आहे
वजीराबाद गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने पेट्रोलिंग करत असताना आरोपी हरीष प्रकाश भगत राहणार दिलीपसिंघ कॉलनी नांदेड या व्यक्तीकडे गावटी पिस्टल व अग्नीशस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाल्या वरून सदरचे पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार यांच्या पोलीस टीमने सदरच्या आरोपीवर छापा टाकून त्यांच्या कडून एक गावठी पिस्टल व अग्नीशस्त्र जप्त केले त्यांची किंमत २५ हाजार रुपये एवढी असून सदर परकारणातील हा आरोपी विना परवाना व बे कायदेशीर रित्या सदरची गावठी पिस्टल बाळगिल्यामुळे वजीराबाद पोलीसांनी अटक केली आहे

0 Comments