Header Ads Widget

नांदेड ते इज्जतगाव अंतरगाव मार्गे सोडण्यात आलेल्या एस टीला तुफानी स्पेशल विद्यार्थ्यांसाठी मीनी बस सोडण्यात यावी सामाजिक कार्यकर्ता नागोराव तोडे यांची मागणी

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील अंतरगाव इज्जतगाव मनूर पाटोदा या मार्गावर राज्य परिवहन मंडळाची नांदेड ते इज्जतगाव आंतरगाव मार्गे सोडण्यात बसेला जनतेची तुफानी गर्दी होत असल्यामुळे बरबडा येथे शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थीना शाळेत जाण्यासाठी जागा मिळत नसल्यामुळे जीव धाक्यात ठेवून बसच्या टॉपवर बसून विध्यार्थाना शाळेत जावे लागत आहे

राज्य परिवहन मंडगळाच्या अधिकाऱ्यानी सदरची गंबीर लक्षात घेऊन या मार्गांवर ज्यादा एक मिनी बस विध्यार्थासाठीच सोडण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता नागोराव माधवराव तोडे गणेश पाटील यांनी केली

तालुक्यातील आंतरगाव मनूर इज्जतगाव पाटोदा त.ब येथील विध्यार्थाना शिक्षण घेण्यासाठी शाळेला जावे लागत असून एकीकडे चिखलमय रस्ता दुसरीकडे या मार्गावर जाण्यासाठी व येण्यासाठी मोठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसला गर्दी असते आणि विध्यार्थाना जीव मुठीत धरून बसच्या टॉपवर बसून जावे लागत आहे

पालकांचा जिव त्यांच्या पाल्यात असल्यामुळे विध्यार्थी  शाळेला सुट्टी झाल्याच्या नंतर विध्यार्थी घरापर्यंत येई पर्यंत पालकांच्या जीव आपल्या पाल्यायात गुंतला असल्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यानी तात्काळ स्पेशल विध्यार्थासाठी मिनी बस सोडावे अशी मागणी आंतरगाव येथील सामाजिक कार्यकर्ता नागोराव माधवराव पाटील तोडे गणेश पाटील यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना केली आहे 

Post a Comment

0 Comments