भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आज एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अक्षरशः अश्लील शिव्यांचा पाऊस तर पडतच असून सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. नरसी येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख रवींद्र भिलवंडे यांच्या नेतृत्वाखाली किरीट सोमय्या यांचा निषेध करुन त्यांच्या प्रतीमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
या विषयावर सोशियल मीडिया वर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अनेक यूजर्सने भाजप आणि किरीट सोमय्याला फाडून काढले आहे. 'ईडी-ईडी करण्याच्या नादात कधी सीडी बाहेर आली कळलंच नाही', 'कपडे उतरविणाऱ्यांचेच आज कपडे उतरलेले दिसले. किरकिऱ्या विकृतांचे प्रताप आज साऱ्या देशाने पाहिले', 'पार्टी विथ डिफरन्स असा दावा करणाऱ्या भाजपला उघडे पाडावे असे रवींद्र भिलवंडे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले.किरीट सोमया यांच्या या कृतीने भाजप ला काळिमा फासल्यागेली असून अश्या प्रकारचा कृत्याने इतरांच्या चुका माडणार्याचीच घोड चूक उघडी पडली आहे अश्या प्रकरणाची चौकशी तर व्हाविच कडक कार्यवाही व्हावी अशी मागणी करीत सर्वत्र तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
किरिट सोमय्या यांची अश्लील व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ तर उडालीच पण त्यांचा राज्यभर निषेध व्यक्त करण्यात येत असून नरसी येथील चौकात उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख रवींद्र भिलवंडे यांच्या नेतृत्वाखाली किरीट सोमय्या यांचा निषेध करुन त्यांच्या प्रतीमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
या वेळी गजानन तमलुरे शहरप्रमुख नायगाव अनिल बोधणे इरफान बेग देविदास सुर्यवंशी, मारोती सुयंवशी, सोपान भेदे ,बालाजी गौड उत्तम बोधणे, सुधाकर भिलवंडे, ईमु पठाण, तनु शेख, शंकर नरसीकर, संतोष देशमुख ,अतिक बागवान, बबलु सुयवंशी ,संदिप भुसावळे ,संजय गायकवाड, शिवाजी ईबितदार, दिलीप सुयवंशी बालाजी चव्हाण लाला गवळी अजहर शेख, अदि उपस्थितीत होते.

0 Comments