नायगावचे तत्कालीन तहसीलदार गजानन शिंदे यांची बदली झाल्याच्या नंतर नायगावच्या तहसील कार्यालयाला तहसिलदार म्हणून महिला तहसीलदार मनुषाताई भगत यांनी पदभार स्वीकारला आहे
नायगावच्या तहसील कार्यालयाकडे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी पंतप्रधान सन्मान योजनेचा लाभ मिळावा म्हणून संबंधित विभागाकडे फाईली दाखल केले असताना सुद्धा त्या फायलीचा अध्याप निपटारा करण्यात आलेल्या नाही ते तात्काळ करण्यात यावा अशी मागणी होत आहे
त्याच बरोबर निराधार योजनेच्या संदर्भात देखील तहसील कार्यालयाकडे गेल्या अनेक वर्षापासून निराधार योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्यामुळे ते लाभ मिळून देण्यासाठी नायगावच्या महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी जास्तीचे लक्ष देण्याची गरज आहे
तहसील कार्यालयाकडे शेतकऱ्यांसह निराधार योजनेच्या लाभार्थीनी फाईली देऊन सुद्धा धुळखात व पेंडिंग आहेत त्या फायलीचा निपटारा करावा असे लाभार्थ्यातून बोलल्या जात आहे
नायगाव तालुक्यात अनेक समस्या आहेत पांदण रस्ते घरकुलांचे प्रश्न अशा अनेक समस्यांनी नायगाव तालुका गांजला चांगलाच गांजला आहे
या बाबीकडे कोणात्या ही राजकीय पुढाऱ्याचे लक्ष नसल्याने नायगाव तालुक्याची चांगलीच वाट लागली असल्याचे वास्तव चित्र असून सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नायगावच्या तहसील कार्यालयाकडे पंतप्रधान सन्मान योजना अंतर्गत मिळणारे दोन हजार रुपयांचा हप्ता मिळण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी तहसीलकडे फायली दाखल केले आहे
परंतु त्याची अद्याप दखल घेतली नाही त्यासाठी तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी लक्ष देतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह निराधाराना आहे
सदरच्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून फाईली दाखल केल्या होत्या ते तशाच पेंडिंग असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत नाहीत त्यासाठी शेतकऱ्यांना सदरच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी नायगावच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी जास्तीचे लक्ष द्यावे अशी मागणी नायगाव तालुक्यातील शेतकरी व लाभार्थ्यांनी केली आहे

0 Comments