हिमायतनगर तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या संत्पधार पावसामध्ये ढगफुटीचा प्रकार झाल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत
त्यामुळे शेतकऱ्यांसह तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी सुद्धा पाण्याच्या प्रवाहात उतरून आपला जीव धोक्यात घालू नये असे आव्हान हिमायतनगरचे कर्तव्यदक्ष नव्याने रुजू झालेले तहसीलदार आदित्य शेंडे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
तहसीलदार यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले आहे की आपल्या शेतातील जनावरांची काळजी घेत असताना कुठे काही जीवित हानी जर झाली तर आपण तात्काळ आपले मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ माहिती त्यांना द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे
ज्या गावांचा संपर्क तुटला त्या ठिकाणच्या फोटोसह माहिती महसूल प्रशासनाला तात्काळ द्यावी कारण आपल्या सुरक्षिततेसाठी हिमायतनगर महसूल प्रशासन सदैव तत्पर असल्याचे यावेळी तहसीलदार यांनी बोलताना सांगितले आहे

0 Comments