Header Ads Widget

हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या रस्त्यासाठी नागोराव शिंदे यांचा लढा - सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून अभिनंदनासह कौतुक .

     नागोराव शिदे
हिमायतनगर.  तालुक्यातील पळसपुर येथील शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी हक्काचा रस्ता मिळाला पाहिजे आणि तो रस्ता पक्का झाला पाहिजे, या एकाच वशाला घेऊन अहोरात्र झटणारे सामाजिक कार्यकर्ते नागोराव शिंदे दादा पळसपुरकर यांनी हाती घेतलेले काम अतिशय कौतुकास्पद आहे.

आज अनेक ठिकाणी शेत रस्त्यावरून वाद, भांडणे आणि कोर्ट-कचेऱ्या सुरु असताना नागोराव दादा यांनी मात्र कोणाच्याही मागे न लागता, साध्या आणि सरळ मार्गाने, कायद्याच्या चौकटीत राहून शेतकऱ्यांना रस्ता मिळवून देण्याचा विडा उचलला आहे.

तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगरचे तहसीलदार  स्वर्गीय परतवाढ , आणि आज किनवट येथे कार्यरत असलेले अजमौदिन नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे शिवबांधन रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढून सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्याने 
सामान्य शेतकऱ्याचां शेतात जाण्याचा रस्ता अडवला जात होता

तर त्यासाठी तहसील कार्यालयात जाऊन पाठपुरावा करणे, आणि आज कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्षिय *तहसीलदार मॅडम सौ पल्लवीताई  टेमकर* यांच्याकडे निवेदन देणे , संमति पत्र देऊन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेणे आणि काही समजूतदार शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन रस्त्याचा प्रश्न सोडवणे, असा त्यांचा कामाचा पद्धतशीर प्रयत्न सुरु आहे.

नागोराव शिंदे यांच्या या उपक्रमामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेताला जाण्या-येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ट्रॅक्टर, बैलगाडी आणि शेती उपयोगी अवजारे आता थेट शेतात जात असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचत आहे.रस्ता हा शेतकऱ्याचा आत्मसन्मान आहे. शेतीला रस्ता नसेल तर शेतकरी प्रगती करू शकत नाही.

आम्हाला कोणाशी भांडण नको, फक्त आमच्या हक्काचा रस्ता हवा," अशी भूमिका घेऊन नागोराव शिंदे लढा देत आहेत.त्यांच्या या निस्वार्थी आणि प्रामाणिक कामाबद्दल तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी बांधवांकडून *"नागोराव शिंदे खूप छान काम" अशी कौतुकाची थाप मिळत आहे.

प्रशासनासोबत समन्वय साधून, शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याचा त्यांचा आदर्श अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

कृषी मित्र कल्याण वानखेडे व जननी फाऊंडेशन परिवाराकडून नागोराव दादांच्या या कार्यास मना पासून शुभेच्छा दिल्या जात आहेत 

Post a Comment

0 Comments