माधव पवार
बिलोलीची आयपीएस अर्चित चांडक यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्यासह ठाण्याचे फौजदार दिनेश येवले, फौजदार संजय अटकोरे बीट जमादार कुमरे यांच्या पथकाने सदरच्या आरोपीला २४ तासाच्या आत अटक केली असून सदरची घटना ही कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फ्लेमिंगो मेडिशन कंपनीच्या बाजूला शंकर महाजन यांच्या शेतातील हेमाडपंथी महादेव मंदिरातील अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने मंदिरात जाऊन मंदिरातील दगडाची पिंड उकलून काढून बाजूला ठेवली व खाली अंदाजे एक ते दीड फुटाचा खड्डा खोदून मंदिरातील पिंडीचे नुकसान केले व विटंबना केली आणि चोरी करण्याचा प्रयत्न आरोपीने केलेला आहे
आरोपीला ताब्यात घेण्यासाठी बिलोलीचे आयपीएस अर्चित चांडक यांनी कुंटूर पोलीसांना दिल्या होत्या त्यानुसार सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार येवले, पोहेका रमेशराव निखाते, कुमरे, लक्ष्मण सोनकांबळे, मोहन व कंधारे,अशोक घुमे, पोलीस जीप चालक रामेश्वर पाटील, होमगार्ड यश यांनी आरोपीना गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे
सदरील घटनेच्या संदर्भात रघुनाथ पिता दिगंबर कमठेवाड वय ६१ वर्ष व्यवसाय शेती राहणार कृष्णूर तालुका नायगाव यांच्या फिर्यादीवरून कुंटूर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा १५८ / २०२२ कलम ३७९ २९५,५११ भादवि, दिनांक ८ सप्टेंबर रोजी ठाण्यात गुन्हा करण्यात आला सदरील गुन्हाचा तपास फौजदार अटकोरे यांच्याकडे देण्यात आला
कृष्णूरच्या महादेव मंदिरातील सोन्याच्या हंड्याची भलतीच चर्चा आहे " राव " मात्र कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी केली तीन आरोपीला जेरबंद " राव " सदरच्या कारवाई दरम्यान चौकशी करण्यासाठी सपोनि पुरी यांच्यासह फौजदार संजय अटकोरे,बिट जेमादार संतोष कुमरे पोलीस जीप चालक पोहेका सदाशिव पाटील यांनी घटनेची चौकशी केली होती
तालुक्यातील कृष्णूर येथील महादेव मंदिरातील पिंड बाजूला काढून सोन्याच्या शोध घेणाऱ्या तीन आरोपीला कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी दिनांक ८ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी अटक केली असून सदरच्या आरोपीच्या सध्याच्या परिस्थितीत चौकशी चालू असून सदरील घटनेत नेमके काय सापडले हे सिद्ध होणार असल्याने चर्चेला परत एकदा रंग चढत असून सदरील प्रकरणातील आरोपीचे नाव बालाजी बाबू इरपे, वय ३५ वर्ष राहणार बरबडा, अशोक मैसनवाड राहणार बरबडा तालुका नायगाव आणि आंनदराव डुकरे वय ३२ वर्ष कोरटा पिंपळगाव नांदेड असे या आरोपीचे नावे आहेत यांना कुंटूर पोलीसांनी अटक केली आहे

0 Comments