Header Ads Widget

हिमायतनगर तालुक्यात २४ तासात ११० मी.मी. पावसाची नोंद ग्रामीण भागाचा संपर्क तुटला पावसामुळे खरडून गेली असेल जमिनीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ द्या डॉक्टर प्रकाशराव वानखेडे

हिमायतनगर : नागोराव शिंदे - 

तालुक्यामध्ये दिनांक २० , २१.  २२  २०२३ रोजी रात्री नऊ ते दहा च्या वेळेत मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी दृश्य झाल्याने ताल्युक्यातील नदी काठच्या भागात शेकडो  हेक्टर वरील सोयाबीन कापूस तूर आधी पिके खरडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे चित्र दिसत आहेत .

 हिमायतनगर या तालुक्याच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी राष्ट्रीय राज्य महामार्ग असलेल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून केलेल्या रस्त्याचे जागोजागी उकडून खड्डे पडून नुकसान झाले आहे

काही ठिकाणी गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे पुंलाची काम अर्धवट असल्याने  पुलावरील पाण्यामुळे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले आहे ढगफुटी दृश्य झाल्याने तालुक्यातील पळसपुर ,डोल्हारी सिरपल्ली वांरगाटाकळी ,धानोरा .मंगरुळचा, घारापुर ,दिघी, टेंभुर्णी, विरसनि,सह काही भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे .'

तालुक्यातून वाहत असलेली पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे तर ओढे  नाले   तुडुंब  भरून  वहात आहेत. आजही सकाळ पासुन पावसाची रीपरीप चालुच आहे .हे हे वृत्तलेपर्यंत पावसाची संतापधार सुरूच होती

शासनाने ढगफुटी सह पावसाने नुकसान झालेल्या हिमायतनगर तालुक्यातील शेत जमिनीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर प्रकाश राव वानखेडे यांनी नायगाव फास्ट न्यूज शी बोलताना केली आहे

Post a Comment

0 Comments