Header Ads Widget

नायगावचे भूमिपुत्र गजानन चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्ष बळकटीच्या मार्गावर - नेणार गजानन चव्हाण !!

           माधव पवार 
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नायगावचे भूमिपुत्र गजानन चव्हाण यांनी नुकताच पक्ष प्रवेश केला असल्यामुळे नक्कीच पक्ष बळकटीच्या मार्गावर जाणार व नेणार असल्याने नक्कीच पक्षाला नायगाव तालुक्यात बळ आणून देण्याची क्षमता गजानन चव्हाण यांच्यात असल्याचे त्यांनी सांगितले आहे 
नायगावचे भूमिपुत्र गजानन चव्हाण यांनी सामाजिक कार्य अनेक वर्ष पासून करत असल्याने अशा नव तरुण व तडफदार कार्यकर्त्यांची नुकतीच इंट्री महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तर सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत झाली असल्याने पक्षाला बळ मिळवून देण्यासाठी सदरचा दमदार कार्यकर्ता तुफानी पक्षांचे काम करणार आहे 
दमदार नेतृत्व व जन सामान्यातील मन मिळाऊ व्यक्तिमत्व असलेली व तरुण वर्गाचे नव तडफदार व्यक्तिमत्व नायगाव येथील रहिवाशी असलेले गजानन चव्हाण यांनी नायगाव शहरात व शहरा बाहेर आणि नायगाव विधानसभा मतदार संघात अतिशय प्रामाणिक पणाने काम करून अनेक प्रकरणाला वाचा फोडली अशा दमदार व्यक्ती महत्वाची एन्ट्री शिंदे गटात झाली आहे 

नायगावचे भूमिपुत्र गजानन चव्हाण यांची राजकीय वर्तुळात चांगलीच त्यांची लौकिकता असल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुढे नेण्यासाठी योग्य तडफदार व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती निवड केल्यामुळे सदरच्या शिवसेनेला नायगाव तालुक्यातून नक्कीच यश मिळणार असल्याचे गजानन पाटील चव्हाण यांनी नायगाव फास्ट न्यूशी बोलताना सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments