Header Ads Widget

नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या काहाळा येथे अपघातात वाका येथील २५ वर्षीय तरुण ठार - कुंटूर पोलीस घटनास्थळी रवाना

         माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या काहाळा बु येथील बस स्टैंड वर अपघात  झाला असल्यामुळे या अपघातात वाका येथील २२ वर्षीय बळवंत गोपीगोपीनाथराव हंबर्डे या नावाचा तरुण जागीच ठार झाला असल्याची माहिती कुंटूर पोलिसांनी दिली आहे
सदरची घटना कळताच कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बरबडा बिटचे ए एस आय निकाते यांच्या पोलीस घटनास्थळी रवाना झाले असून सदरील घटनेची पाहणी केली आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही सदरची घटना दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी अंदाजे साडे सात ते पावणे आठ वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याचे सांगण्यात येते व सदरची माहिती मयताच्या नातेवाईकाना कळविण्यात आली असल्यामुळे नातेवाईक येत असल्याचे सांगितले आहेंबरबडा बिटचे ए एस आय निकाते यांनी सांगितले व मयताचे नाव बळवंत गोपीनाथराव हंबर्डे राहणार वाका तालुका लोहा यांनी एम एच २६ सी बी ३१७६ वर नायगावाकडे जात असताना एम एच ०४ जी आर ४८३१ आयचर थांबले असताना पाठी मागून मोटार सायकल स्वार धडक दिल्यामुळे जागीच ठार झाला असल्याची माहिती ए एस आय निकाते यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments