Header Ads Widget

कुंटूर पोलिसाची जुगार अड्डयावर धाड पाच आरोपी ताब्यात ३ लाख १३ हाजार ७०० रुपयाचा मुद्देमाल जप्त : सपोनि विशाल पाटील भोसले यांची माहिती !!

       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलिसानी सुजलेगाव येथील एका शेतातील जुगार अड्डयावर धाड मारून पाच आरोपी ताब्यात घेतले तर घटनास्थळा वरून ३ लाख १३ हाजार ७०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती ठाण्याचे सपोनि विशाल पाटील भोसले यांनी दिली आहे 
नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉ निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार ठाण्याच्या अंतर्गत पोलिसांच्या नजरेत चुकून चालत असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्याच्या सूचनेच्या अनुषंगाने कुंटूर पोलीस ठाण्याचे दमदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी दमदार कारवाही केली आहे 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या सुजलेगाव शिवारात कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या पोलीस टीमला गोपनीय माहिती मिळाल्या नुसार सदरची टीम जुगार अड्ड्यावर जाऊन छापा मारला आहे

कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी पूर्वी सुद्धा यापूर्वी ठाण्याच्या अंतर्गत कसल्याच प्रकारे अवैध धंदे चालू देणार नाही असा कडक इशारा दिला आहे 

ठाण्याच्या अंतर्गत पोलिसांच्या नजरात चुकून अवैध धंदे करणाऱ्याच्या विरोधात सतत कडक कारवाई करण्यात येईल असे कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments