माधव पवार
नांदेड जिल्ह्याचे देगलूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या खानापूर फाट्याजवळ ट्रक व मोटर सायकलच्या
अपघातात नरसी येथील एक युवक ठार झाल्याची घटना दिनांक ३ जुन २०२३ रोजी दुपारी साडे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे
देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहम माच्छरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटना स्थळी रवाना झाले असल्याची माहिती पोलीस ठाण्याची कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सोहम माच्छरे यांनी सांगितले सदरच्या ट्रकचा चालक फरार झाला असला तरी ट्रक देगलूर पोलीसाच्या ताब्यात आहे
तालुक्यातील नरसी येथील युवक हा मोटार सायकल क्रमांक एम एच २६ बी एम ६०४० व एम २६ ए डी ०३१२ ने धडक लागली असल्यामुळे ट्रकच्या धडकेत जागीच ठार झाला सदरचे प्रेत ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहम माच्छरे यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी देगलूरच्या ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेल्याचे सांगण्यात येत आहे
सदरचा अपघात खानापूर फाट्यावर झाला अपघातात नरसी येथील महेश बाबरे जागीच ठार झाला असून सदरची घटना देगलूर पोलीस ठाण्याच्या हदीत घडली आहे
देगलूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत खानापूर फाट्यावर घडलेल्या घटनेतील महेश महेश अशोक बाबरे हा नायगाव तालुक्याच्या नरसी येथील रहिवासी असल्याचे सांगितले आहे
सदरच्या घटनेची माहिती मिळत असल्याचे नातेवाईक देगलूरला रवाना झाले असे समजते सदरील घटनेचा पंचनामा करून देगलूर पोलीसानी सदरच्या मयत महेश बाबारेला दवाखान्यात पोलिसांनी घेऊन गेले सदरील घटनेचा पुढील तपास देगलूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सोहम माच्छरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत

0 Comments