Header Ads Widget

लालवंडी येथे एका शेतकऱ्याच्या गोऱ्यावर वीज पडून ठार ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान तात्काळ आर्थिक मदत द्या - मागणी


माधव पवार : मारोती कोंपलवार

नायगाव तालुक्यातील मौजे लालवंडी येथे एका शेतकऱ्याच्या गोऱ्यावर दिनांक ४ जुन २०२३ रोजी दुपारी पावणे चार वाजता झाडाखाली बांधलेल्या गोर्यावर वीज पडून गोरा ठार झाला असल्यामुळे शेतकऱ्याचे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याने शासनाने तात्काळ आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे

तालुक्यातील लालवंडी येथील गरीब शेतकरी यांनी आपल्या शेतात असलेल्या झाडाखाली ७० ते ८० हजार रुपयांच्या गोऱ्याला झाडाखाली बांधले होते व सदरचा शेतकरी श्रीकांत हनमंतराव निकलपुरे यांनी त्यांच्या शेतात २०० फूट अंतरावर कडबा जमा करीत होता दिनांक ४ जुन,२०२३ रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन सदरील शेतकऱ्याच्या गोऱ्यावर वीज पडून गोरा ठार झाला आहे

नायगाव तालुक्यात दिवसभर कडाकाचा उन्हात मोठ्या प्रमाणात तापमान वाढले व चार ते पावणे चार वाजण्याच्या दरम्यान अचानक वादळी वारे सुटले व त्यातच पावसाने जोर धरला आणि विजेच्या कडकडाटमध्ये लालवणीच्या एका शेतकऱ्यांच्या गोऱ्या वर वीज पडल्याने सदरचा लाल गोरा यांची अंदाजे किंमत ८० हाजार रुपये बाजार भावाने होत असल्यामुळे शासनाने तात्काळ शेतकऱ्याला मदत देऊन सहकार्य करावे अशी मागणी जोरदारित आहे 

Post a Comment

0 Comments