हिमायतनगर.हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातिल बेलमंडळ येथील उपसा सिंचन योजना व कुर्तडी उपसा सिंचन योजनेअंतर्गत सर्वेक्षणाचे काम सुरू असताना मनाठा येथील तलावाची आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी प्रत्यक्ष आज पाहणी केली आहे यावेळी मनाठा तलावाची उंची वाढवून उपसा सिंचनाद्वारे तलावात पाणी साठविणे आणि या पाण्याचा उपयोग बंधिस्त नलिका पद्धतीद्वारे सिंचनासाठी करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रस्ताव तयार करण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार बाबुराव कदम कोहळिकर यांनी सूचना केल्या आहेत.
या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊन शेतीला शाश्वत पाणीपुरवठा मिळण्यास मदत व्हावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी जलसंधारण व सिंचन सुविधांच्या विकासाला प्राधान्य मिळेल असे हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळिकर यांनी दैनिक लोक परिवर्तन च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे

0 Comments