Header Ads Widget

गावात भीम जयंती साजरी केली म्हणून युवकाची हत्या केल्या प्रकरणी ५ जुन रोजी शंकरनगर येथे तीव्र आंदोलन सपोनि संकेत दिघे यांना निवेदन

        माधव पवार
महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथे गावातील सुवर्णाच्या गैरकायद्याच्या काही गावगुंडा कडून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भीम जयंती गावात साजरी का केला म्हणून मयत अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे

बौध्द समाजातील तरुण युवकावर खंजराने मयत अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या करण्यात आल्या प्रकरणी दिनांक ५ जुन २०२३ रोजी शंकर नगर येथे कार्यकर्ते तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे यांना निवेदन देऊन कळविले आहे 

नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथे राज्य घटना काराची जयंती गेल्या साठ वर्षा पासून गावामध्ये भीम जयंती साजरी करण्यात येत नव्हती होत परंतु भीम सैनिक मयत अक्षय भालेराव यांनी या वर्षी गावामध्ये जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या कडून अधिकृत परवानगी घेऊन भीम जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून मयत अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या करण्यात आली असल्यामुळे जिल्ह्या हादरला आहे 

बोंढार हवेली मयत अक्षय भालेराव यांची हत्या केल्या प्रकरणी आरोपीला कडक शिक्षा करण्यात यावी म्हणून त्यांच्या निषेधार्थ दिनांक ५ जुन २०२३  रोजी शंकर नगर तालुका बिलोली येथे फुले शाहू आंबेडकर क्रांती मंचच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार  आहे

यावेळी भास्कर भेदेकर नागसेन जिगळेकर गौस शेख इंद्रजीत डुमणे सुनील कांबळे प्रमोद फकीरे निळकंठ तरटे प्रवीण भालेराव प्रकाश  होनसांगळे मुनेश्वर सोनकांबळे दीपक कांबळे गंगाधर भेदेकर खाजाभाई शेख आदीने 

अशा पद्धतीचे निवेदन रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांना देऊन कळविले आहे.


Post a Comment

0 Comments