नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे घुंगराळा येथील खंडोबा रायाच्या मंदिरातील आज्ञात चोरट्यानी तीन दान पेट्या पैकी दोन दान पेट्या फोडून त्यातील एक लाख ५ हाजाराचा मुद्देमाल पळविला असल्याची घटना दिनांक २ जुन २०२३ रोजी संध्याकाळी घडली आहे
कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार किरवले यांच्यासह बिट जेमादार संतोष कुमरे पॉ.का अशोक घुमे यांनी घटनास्थळी रवाना झाले सदरील घटनास्थळी नांदेडच्या श्वान पथकासह फिंगर प्रिंट अधिकाऱ्याला पाचरण करण्यात आले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या घुंगराळा येथील रहिवासी असलेले व खंडोबा मंदिराची पुजारी गोविंद दत्ता बुवा भारती यांनी दिनांक २ जुन २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी पूजा व आरती करून घराकडे मंदिराचे गेट बंद करून गेले होते
दिनांक ३ जुन २०२३ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान सदरचा पुजारी मंदिरात गेला असता उत्तरे कडील गेट मंदिराचे मोकळे दिसले व पुजारी मंदिरात प्रवेश केल्याच्या नंतर त्यांना तीन दानपेट्या पैकी दोन दान पेट्या अज्ञात चोरट्यांनी फोडल्या असल्याचे लक्षात आले आहे
घुंगराळा येथील खंडोबा मंदिर पासून शंभर ते दीडशे फुटावरच पोलीस बिन तारी संदेश पुन : प्रक्षेपण केंद्र असताना सुद्धा अज्ञात चोरट्यानी मंदिरातील दान पेट्या फोडल्या असल्यामुळे कुंटूर पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जूटली आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुंगगळयाच्या खंडोबा मंदिरातील अज्ञात चोरट्यांनी फोडलेल्या दानपेटीत अंदाजे ६० हजार रुपये व दुसऱ्या दानपेटीत नगदी दहा हजार रुपये व चांदीचे घोडे टॉप पाळणे चैन चांदीचे डोळे इत्यादी किमतीचे अंदाजे ३५ हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने पळविला आहे
कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्ग दर्शनाखाली फौजदार किरवले यांच्यासह बीट जेमादार संतोष कुमरे व अशोक घुमे यांनी सदरील घटनेची पाहणी करून पंचनामा केला व अज्ञात आरोपीच्या विरोधात कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

0 Comments