माधव पवार
ग्रहविभागाच्या अंतर्गत काम करणाऱ्या व संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत काम करणाऱ्या खेड्या पाड्यातील गावांत अतिशय महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या पोलीस पाटलाच्या व गावात कोतवाल म्हणून काम करणाऱ्याच्या मोठया प्रमाणात रिक्त जागा असल्यामुळे ह्या जागा तात्काळ भरण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे
सन १७ डिसेंबर १९६७ रोजी पोलीस पाटील ह्या पदाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी ग्राम पोलीस अधिनियम १९६७ कायदा करून पोलीस पाटील ह्या गाव पातळी वरील शेवटच्या घटकाची निर्मिती करण्यात आली आहे
त्यावेळी पोलीस पाटलांना शेतसारा वसूल करणे सामान्य तक्रारी न्यायनिवाडा करण्यासाठी गावपातळीवर पंच कमिटी स्थापन करण्याचे कार्य पाटील करत असतात त्यामुळे त्यांच्या रिक्त जागा शासनानी भरावेत अशी मागणी केली जात आहे
पोलीस ठाणे प्रमुख व गावचा पोलीस पाटील यांच्यात ठाण्याचा कारभार चालतो गावांत काही आडी अडचणी आल्यास पोलीस अधिकारी सर्व प्रथम पोलीस पाटलाशी संपर्क करून माहिती घेत असतो त्यांच बरोबर पोलीस पाटला कडून शासनाचा व्यक्त म्हणून पोलीस ठाणे प्रमुख मोठया विश्वासाने कामे सांगतात हे मात्र निश्चित आहे
पोलीस पाटलांना त्यांची चौक कामगिरी बजवावी लागते त्यामुळे ग्रामीण भागात पोलीस पाटील व कोतवाल यांच्या रिक्त जागा शासनानी भरणे आवश्यक आहे
कोतवाल हा गावातील तलाठी यांनी सांगितलेली कामे तसेच गौणखनिज देखरेख करतो कोतवालाची नेमणूक तहसीलदार मामलेदार करतो प्रत्येक साझासाठी एक कोतवाल असतो कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार तहसिलदारास असताना सुद्धा बऱ्याच पैकी गावांत कोतवाल नसल्यमुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सेवकावर कामे भगवून घ्यावे लागत आहे

0 Comments