Header Ads Widget

नाईन ए साईड क्रिकेट संघटनेच्या क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात आमदार हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा ६ जुन रोजी बक्षीस वितरण व सांगता


नांदेड : नायगाव फास्ट न्यूज :-:

दि. नांदेड दक्षिण आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  नाईन ए साईड क्रिकेट  संघटनेच्या वतीने नांदेडच्या श्री गुरुगोविदसिंघजी स्टेडियम मैदानावर दि. 4 जुन पासुन  क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली.  6 जुन रोजी बक्षीस वितरण व सांगता  मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे

संयोजक शेख असलम यांनी सांगितले दि. ४ जुन रोजी सकाळी ९ वाजता क्रीडाधिकारी राजेश्वर मारावार, आ. हंबर्डे यांचे पुत्र  राहुल हंबर्डे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गुपीले,  स्टेडियम व्यवस्थापक चवरे, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर शिंदे,  नाईन ए क्रिकेट संघटना राज्य सचीव शेख असलम, राज्य अध्यक्ष राहुल वाघमारे  उपस्थित होते

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संदीप कदम, रोशन जोगदंड, सय्यद अयाज खादरी, महम्मुद मुबीन,आकाश बनसोडे, मुकुंद डमरे, , शेरखान पठाण, संतोष कांबळे परीश्रम घेत आहेत

यावेळी पंच म. अत्तर, भरत चव्हाण, मोईन अब्दुल रहीम यांनी भूमिका पार पडली ६ जुन रोजी सायंकाळी ५  वाजता अंतीम सामना खेळविला जाईल. तसेच मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण व स्पर्धेची सांगता होणार आहे. या स्पर्धेत विजेते संघांना होणार्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवडले जाणार आहे.

Post a Comment

0 Comments