माधव पवार
लोहा तालुक्यातील उस्माननगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या फुलवळ तांडा येथील रहिवासी असलेल्या आरोपीने संतोष गंगाराम चव्हाण यांच्या स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असलेल्या घरा समोरील अंगणात गांज्याच्या दोन झाडाची लागवड केली असल्यामुळे उस्माननगर पोलीसाना गोपीनाथ माहिती मिळाल्या वरून धडाकेबाज धाड मारून सदरचे गांज्याचे झाडाचे वजन अंदाजे झाडाच्या मुळीसह वजन सहा किलो चारशे ग्राम त्यांची किंमत ३२ हजार रुपयांचा असा मुद्देमाला उस्माननगर पोलिस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यानी पकडून कायदेशीर कारवाई दिनांक ३ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजून १५ मिनिटानी केल्याचे सांगण्यात येत आहे
तालुक्यातील उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी डी भारती यांनी दमदार कारवाई केली आणि त्यांच्या फिर्यादी वरून आरोपी रामधन गेमा राठोड वय ६५ वर्ष राहणार फुलवळ तांडा यांना पोलीसांनी गांज्याच्या दोन हिरगार झाडासह ताब्यात घेतले आहे
उपविभागीय पोलीस अधिकारी थोरात यांनी राजपात्रित अधिकारी म्हणून कंधार पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आर एस पडवळ यांना पाठविले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा सदर प्रकरणाचा उस्माननगर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला व त्या पूर्वी फौजदार पल्लेवाड यांनी राम गेमा राठोड वय ६५ वर्ष राहणार फुलवळ तांडा असे त्यांनी नाव सांगितले फिर्यादीने शासकीय पंच पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलिसांनी झाडांची पाहणी केली व घटना स्थळी गांज्याचे दोन झाडे दिसून आली आहे
ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या फुलवळ तांडा येथील गांज्याच्या झाडाची खात्री दायक माहिती उस्माननगर पोलिसांना मिळताच पो.का मोरे सपोनि पी डी भारती यांना सदरची माहिती दिली असल्यामुळे प्रकाश उत्तम जाधव राहणार फुलवळ तांडा यांनी डायल ११२ वर फोन केला असल्याचे सांगण्यात येते ? सदरील प्रकरणातील आरोपी रामधन गेमा राठोड फुलवळ यांनी त्यांच्या घरासमोरच गांज्याचे दोन झाड लावल्याचे निदर्शनास आले आणि सदरील घटनेची माहितीची शहानिशा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्याची सूचना केली पोलिसांना तहसीलदार यांनी सांगितल्याचे समजते

0 Comments