नायगाव विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे -
अतिवृष्टीनंतर पावसाची मोठ्या प्रमाणात उघडीप;झाल्याने गणपती बापाच्या सेवेत मग्न असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा पावसाच्या पाण्याचे 'विघ्न' आले असून या मुळे सोयाबीन वाळू लागले तर कापसाची चाप गळू लागली आहेत.नायगाव तालुक्यातील सर्वच गावात पिके धोक्या खाली आली आहेत : नायगाव तालुक्यातील काही गावांना बारूळ चे धरण उशाला अन् कोरड घशाला अशी अवस्था विशेषतः मांजरम भागात आगोदरच आहे.तर आता अवेळी विद्युत पूरवठा खंडीत होण्याने विद्युत वितरण च्या लहरी कारभाराचे विपरीत परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे.विहरित आहे पण पोवऱ्यात नाही या मुळे नुकसानीला सामोरे जाताना शेतकऱ्याची अवस्था इकडे आड आणि इकडे विहीर अशी झाली आहे.
मागील २५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पिके जगवणे कठीण झाले आहे. अगोदरच पाऊस नसल्याने आणि पुन्हा अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले होते. आता मात्र पावसाने उघडीप दिल्याने ऐन सणासुदीत गणपतीच्या काळात शेतकऱ्यांवर विघ्न आले आहे. तालुकाभरात हजारो हेक्टरवरील पीके अडचणीत आली असून पंचनामे आणि मदतीचा मात्र अद्याप पत्ता नाही.
बारूळ प्रकल्प येथे पाणी असूनदेखील वेळेच्या आत न सोडल्याने नायगाव तालुक्यात पिके धोक्यात आली आहेत.आ.पवार यांनी पत्र दिल्याने पाणी सोडण्यात येणार असले तरी आता बरीच वेळ गेली असून,विद्युत पुरवठा व्यवस्थितीत नसल्याने पाणी जवळ असून ही ती या परिसरातील हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. या प्रकल्पातून सर्वाधिक फायदा लोहा, कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना होतो. या भागातील जमिनी खडकाळ असल्याने खरिपासाठी पाणीपाळ्यांचे नियोजन केले तर त्याचा फायदा पिकांसह जनावरांनादेखील होईल.
बारूळ प्रकल्प व छोट्या व मध्यम प्रकल्पांच्या कालव्यातून पाणी सोडल्यास त्याचा फायदा सोनखेड, लोहा, नायगाव, देगलूर, मुखेड येथील शेतकऱ्यांना होईल, त्यातूनच हाती येत असलेले सोयाबीन, कापूस व अन्य पिके वाचविण्यास शेतकऱ्यांना पाण्याचा आधार होईल. असे युवा शेतकरी विषवनाथ शिंदे ,बालाजी परिहार व अन्य शेतकरी यांनी म्हंटले आहे.
■ लिबोटी.बारूळ हे प्रकल्प उंचावर असून, त्यातून पाणीपाळ्याचे नियोजन केल्यास मोटारीशिवाय रानात पाणी लिफ्ट होऊ शकते. त्यामुळे विजेचीही बचत होईल. एका पाणीपाळीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे प्रशासनाने २४ तासांच्या आत नियोजन करून तत्काळ पाणी सोडावे, अशी मागणी जोर धरत आहे. सोडण्याबाबतही नियोजन झाल्याचे कळते.
तसेच बळेगाव बंधाऱ्याहून मांजरम, कोलंबी येथेही लिफ्ट एरिकेशन चे काम चालू आहे. पण या प्रकल्पाच्या नियोजनामध्ये खरीप रब्बी, उन्हाळी तिन्ही हंगामामध्ये पाणी पाळ्या देण्याचे नियोजन आहे. परंतु सध्या येत नाही. शासन आणि प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे कुठलेच नियोजन होताना दिसत नाही.
" शेती भिजवणीसाठी डोळ्यात तेल "
"" महावितरणचे विद्युत पुरवठ्याचे गणित फेल ""
तांत्रिक मनुष्यबळाची कमतरता व महावितरणकडे वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे वीजपुरवठ्याचे गणित फेल झाले आहे.पूर्णता गणित बिघडले आहे. त्यातून लोडशेडिंग आणि अचानक वीज गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी होणारा वीजपुरवठा आणि उन्हाच्या तीव्रतेने वाळत असलेल्या पिकांना वाचविण्यासाठी रात्रीचा दिवस करण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरला नाही. बहुतांश शेतकरी रात्रीलाच भिजवणीचे काम हाती घेत आहेत.
त्यामुळे पाणी असूनदेखील शेतकऱ्यांची अतिवृष्टीपासून बचावलेली सर्व पिके पाण्याअभावी वाळून जाण्याची शक्यता नाकारतापाणी पावसाळ्यात तेलंगणात जाणार नाही आणि ते पाणी उपसून परिसरातील गावातील तलाव, धरणामध्ये सोडण्याचे नियोजन आहे, परंतु, नियोजनाच्या अभावातून हक्काचे पाणी तेलंगणात वाहून जात पावसाअभावी सोयाबीनचा पालापाचोळा होत असून शेंगाची वाढ खुंटली आहे.

0 Comments