Header Ads Widget

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून शकडो लाडक्या बहीणीचे पैसे बंद केल्यामुळे संताप - आम्ही काय लाडक्या बहिणी आहोत की सावतर हे भावाने सांगावे !!

            माधव पवार 
निवडणुकीच्या कार्यकाळात राज्यातील महिलांचे मत वळविण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या सरकारने अमलात आणली असली तरी महिलांच्या मतावर निवडून आलेले हे सरकार सदरच्या लाडक्या बहिणीला सदरच्या योजनेतून वगळून टाकले आहे

सदरचे सरकार हे निवडणुकीच्या तोंडावर लाखो महिलाचे फॉर्म भरून घेतले आणि त्यांना पात्र ठरविले आणि त्या पात्र महिलेला काही महिने हप्ते देऊन अचानक पणे लाडक्या बहिणीला सदरच्या योजनेतून 
वगळले आहे

ह्या लाडक्या बहिणी सरकारच्या सावतर बहीणी आता झाल्या आहेत का ? असा प्रश्न निर्माण झाला असून सदरच्या सरकारने शकडो लाडक्या बहिणी ज्या कोणी असतील त्यांना पात्र करून दीपावली अगोदर त्यांच्या बँक खात्यात ज्या महिन्या पासून बंद केले तेव्हा पासून हप्ते तात्काळ जमा करण्यात यावेत 

मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना काही कालावधी साठी वापरण्यात आली आणि काही लाडक्या बहिणीचे पैसे चालू ठेवले आणि शेकडो लाडक्या बहिणीचे पैसे बंद केले आहे

राज्यातील काही लाडक्या बहिणीचे पैसे चालू ठेवले म्हणजे हे काय लाडक्या बहिणी आहेत तर मग ज्या बहिणीचे पैसे बंद केले त्या काय बहिणी मुख्यमंत्री योजनेतील सावतार बहिणी आहेत की काय असा प्रश्न चर्चेला जात आहे 





Post a Comment

0 Comments