Header Ads Widget

या राज्यातल दळभद्री निवडणूक आयोग जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका कधी घेणार ? खुर्च्या रिकाम्या !!

              माधव पवार 
या राज्यातल दळभद्री निवडणूक आयोग जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका कधी घेणार ? असा प्रश्न जन सामान्य माणसाला भेडसावत असताना सुद्धा सदरचे निवडणूक आयोग हे निवडणुका घेण्या ऐवजी मूग गिळून बसले आहे 

जिल्हा परिषद व पंचायत समितीची मुदत संपून गेले चार पाच वर्ष जवळ पास होत असताना सुद्धा या राज्यातले दळभद्री निवडणूक आयोग या सरकारचे चकार नाही लाचार बनले असल्याचे सदरच्या जन सामान्य माणसातून बोलल्या जात आहे 

ग्रामपंचायतच्या ही मुदती संपून बरेच महिने झाले तरी सदरच्या निवडणुका घेण्यासाठी सदरचे निवडणूक आयोग बग्याची भूमिका घेत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

निवडणूक आयोग हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका जवळ पास चार ते पाच वर्षा पासून घेत नसल्यामुळे पंचायत समित्या वाऱ्यावर आहेत 

गावचा कारभार सांभाळण्यासाठी सरपंच उपसरपंच यांची अत्यंत गरज असताना सुद्धा या राज्यातले दळभद्री सरकार व निवडणूक आयोग हे कोणत्याच निवडणुका घेण्यासाठी ठोस निर्णय घेत नसल्यामुळे जन जन सामान्यातुन संताप व्यक्त केला जात आहे 

Post a Comment

0 Comments