Header Ads Widget

नायगाव तालुक्यासह रुई व रुई परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला - लोकांनी केली रस्त्यावर गर्दी -जनतेनी घाबरून जावे नये नायगावच्या तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांचे आवाहन !!

       माधव पवार 
नायगाव तालुक्यासह रुई व रुई परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला दिनांक ३ ऑक्टॉबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजून ४३ मिनिटानी घरात जाणवला असल्यामुळे सदरच्या लोकांनी घरा बाहेर तात्काळ येऊन एकमेकांना विचार पूस भूकंप झाला का म्हणून केली व रस्त्यावर येऊन गर्दी केल्याचे दिसून आले आहे 

नायगावच्या महिला तहसीलदार डॉक्टर धम्म प्रियाताई गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यानी असे सांगितले जनतेने कसल्याच प्रकारे घाबरून जाऊ नये व आपण सतर्क राहण्याचे ही सदरच्या तहसीलदार डॉक्टर धर्मप्रियाताई गायकवाड यांनी आवाहन केले आहे 

नायगाव शहरासह इतर ठिकाणी म्हणजे तालुक्यात कसल्याचे प्रकारचे जीवित हानी किंवा कोणत्या ही घराचे नुकसान झाले नाही कोणी अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन ही नायगावच्या तहसीलदार डॉ धर्मप्रियाताई गायकवाड यांनी केले आहे - 

Post a Comment

0 Comments