Header Ads Widget

राज्यातील कंत्राटी नौकर भरतीचा शासनादेश व जिल्हा परिषद शाळा दत्तक देण्याचा आदेश तात्काळ रद्द करा - राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वानाथ बडूरे यांचे तहसीलदाराना निवेदन

        माधव पवार
राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील कंत्राटी नौकर भरतीचा शासनादेश व जिल्हा परिषद शाळा दत्तक देण्याचा आदेश काढल्यामुळे विद्यार्थाचे भविष्यात मोठे शैक्षणिक नुकसान होणार असल्यामुळे सदरचे काढलेले निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नायागांव तालुकाध्याक्ष विश्वानाथ बडूरे यांच्या नेतृत्वाखाली नायगाव तहसीलदाराना दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी निवेदन देण्यात आले आहे

राज्य शासनाने दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी राज्यातील कंत्राटी नौकर भरतीचा शासनादेश व जिल्हा परिषद शाळा दत्तक देण्याचा आदेश काढल्यामुळे राज्यातील सरकारी कार्यालयातील नौकर भरती कॉन्टॅक्टरच्या माध्यमातून कामे करून घेणारा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील मोठया प्रमाणात बेरोजगारी वाढण्याची भीती निर्माण झाली असे त्या तहसीलदाराना दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुकाध्याक्ष विश्वानाथ बडूरे यांनी नमूद केले आहे

भारतीय संविधानाने दिलेला हाक्क समाप्त करून राज्यातील तरुण वर्गाला बेकारीच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न केला जात असून सदर सरकारने काढलेला कंत्राटी नौकर भरतीचा शासनादेश व जिल्हा परिषद शाळा दत्तक देण्याचा आदेश तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वानाथ बडूरे यांनी तहसीलदाराना निवेदन दिले आहे 


Post a Comment

0 Comments