Header Ads Widget

हिमायतनगर तालुक्यात आंतरराज्य चोरांच्या टोळीचा धोका वाटत असल्याने गावात रातरिचि गस्त सुरू करा गावात अनोळखी व्यक्ती फिरत असल्यास कायदा हातात घेण्या अगोदर पोलीस स्टेशन हिमायतनगरला कळवा पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांचे आवाहन !!

      नागोराव शिदे 
हिमायतनगर हिमायतनगर तालुक्याच्या. शेजारील तालुक्यांमध्ये झालेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर तालुक्यातही चोरींच्या घटनांची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी पळसपुर सह हिमायतनगर तालुक्यातील संपूर्ण शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दैनिक लोक परिवर्तनाच्या प्रतिनिधी शि बोलतांना तालुक्यातील जनतेला प्रसिद्धिच्यामाधमातुन आव्हान केले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांना कडक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक गावातील ६ ते ७ ग्रामस्थांनी एकत्र येऊन पुढील एक आठवडाभर रात्रीच्या वेळी गावात गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे ग्रामीण भागात
सतर्क राहण्याचे पो. नि. लक्ष्मण केंद्रे यांचे आवाहन
रात्रीची सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत होणार आहे. तसेच आपल्या भागात किंवा परिसरात कोणताही अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्ती फिरताना आढळून आल्यास नागरिकांनी कायदा हातात न घेता तात्काळ हिमायतनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असेही आवाहन केल्याचे पो. नि. लक्ष्मण केंद्रे यांनी  बोलताना सांगितले आहे

Post a Comment

0 Comments