Header Ads Widget

हिमायतनगरचे नायगाव फास्ट न्यूज तालुका प्रतिनिधी नागोराव शिंदे यांचा विशेष सत्कार !!

      नागोराव शिंदे 
हिमायत नगरचे जेष्ठ पत्रकार तथा नायगाव फास्ट न्यूजचे विशेष तालुका प्रतिनिधी व दैनिक लोक परिवर्तनचे हिमायतनगर तालुका प्रतिनिधी नागोराव शिंदे पळसपुरकर यांचा सत्कार करण्यात आला आहे 
कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी. नांदेड चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख विज्ञान विद्या तज्ञ डॉक्टर देविकांत देशमुख, पीक संरक्षण शास्त्रज्ञ प्राध्यापक माणिकराव कल्याणकर, कृषी विज्ञान शास्त्रज्ञ प्राध्यापक संदीप जायभाये यांच्यासह कृषी मित्र कल्याण पाटील वानखेडे यांनी आज दैनिक लोक परिवर्तनाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सत्कार केला आहे 

हिमायतनगरचे जेष्ठ पत्रकार नागोराव शिंदे पळसुरकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात  दिनांक २७ रोजी अहिल्यानगर येथे येत असल्याने वरील मान्यवरांनी आज पळसपुर येथे नागोराव शिंदे यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत

Post a Comment

0 Comments