Header Ads Widget

राज्यातल्या दळभद्री सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यावर दुष्काळाचे सावट असताना सुद्धा लोकप्रतिनिधी खातात काजू बदाम -तात्काळ आर्थिक मदत जाहीर करा !!

            माधव पवार 
राज्यात व केंद्रात भारतीय जनता पार्टी सरकार सत्तेत आले तेव्हा पासून राज्यातील व देशातील शेतकऱ्यासह जन सामान्य माणसाला आर्थिक भूर दंड बसत असल्याने जनसामान्य माणूस महागाईच्या भडक्यातून भाजून निघाला आहे 
सध्या राज्यात गेल्या दोन महिन्यापासून निसर्ग राजा परसत नसल्यामुळे शेतकऱ्यावर कोरड्या दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे 

हे राज्यातील दळभद्री सरकार शेतकऱ्यांना कोरडा दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत करण्या ऐवजी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत या सरकार मधील लोकप्रतिनिधी काजू बदाम यांच्यावर मोठा ताव मारला असल्याचे अनेक वर्तमान पत्रातून व सोशल मीडियावर त्यांचे काजू बदाम खातानाचे व्हिडिओ वायरल झाले आहे 

या राज्यातले तीन चाकी सरकार हे शेतकऱ्यांचा नुसतो पुळका करत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे केविलवाना पणा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून पुळका जनतेला दाखवत आहे 

गेल्या वर्षीच्या तुलनेत पाहिले तर यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर जास्त भर दिला असला तरी पेरणीच्या वेळी तूरळक पाऊस पडला असलेले शेतकरी शेतीचे कामे आटवून पेरणी केली आहे 

तेव्हा पासून राज्यात पीक पूरक पाऊस झाला नसल्यामुळे बकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन वाळून जाऊन मुगाचा दाना असतो तेवढाच सोयाबीनच्या शेंगातील बी तसेच झाल्याचे दिसून येत असले तरी सदरच्या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत तात्काळ जाहीर करावी अशी शेतकऱ्यासह जनतेची जोरदार मागणी आहे 



Post a Comment

0 Comments