सरकारने शेतकऱ्याला तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांचे डोळे पुसू नये हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ मदत शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी अशी मागणी तमाम शेतकऱ्यानी केली असली तरी नांदेड जिल्ह्यातील मुखेड व मुदखेड या सुद्धा तालुक्याला तात्काळ दुष्काळ यादीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी जोर धरीत आहे
नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुलजी कर्डिले यांनी जिल्ह्यातील मुखेड व मुदखेड ह्या सुद्धा दोन तालुक्याला लवकरच समाविष्ट करतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे
राज्यात पेरणीच्या वेळेस तुरळ पाऊस पडला असल्याने शेतकऱ्यांनी शेतात आपली पेरणी केली होती तेव्हापासून निसर्ग राजाने बरसला नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे
शेतकऱ्यांच्या शेतातील पीक वाळून गेले आणि कोरडा दुष्काळ पडला असताना सुद्धा सरकारने नांदेड जिल्ह्यातील मुखेड व मुदखेड हे दोन तालुके कोर्ट या दुष्काळात समाविष्ट केले नसल्यामुळे शेतकऱ्याचा संतापाची लाट पसरली आहे
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे शेतकऱ्यांची जाण ठेवणारे व्यक्तिमत्व असल्यामुळे सदरच्या ह्या दोन्ही तालुक्याला लवकरच दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट करून शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळवून देतील असा शंभर टक्के विश्वास शेतकरी व जनसामान्य माणसाने व्यक्त केला आहे

0 Comments