राज्यात गेल्या जुलै महिन्यापासून निसर्ग कोपला असल्यामुळे राज्यात कोरडा दुष्काळाचे सावट अर्थात संकट कोसळले असल्यामुळे व त्यात श्री गणेशांचा मोठा उत्सव एकीकडे संपन्न होत असताना श्री गणेशाचे विसर्जन कुठे व कसे करायचे असा प्रश्न सर्वत्र गणेश मंडळांना पडला आहे
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने गेल्या दोन महिन्यापासून दडी मारली असल्याने ग्रामीण भागात नाले व नदी कोरडीच असल्यामुळे श्री गणेशाचे विसर्जन पाण्याची पातळी खोल नसल्याने सदरच्या श्री गणेश यांचे विसर्जन कुठे करायचे असा प्रश्न सध्या तरी निर्माण झाला आहे
ग्रामीण भागात श्री गणेशाचे विसर्जन काही पाझर तलावामध्ये केल्या जात होते परंतु यंदा तळ्यातच पाणी उपलब्ध नसल्यामुळे व पाण्याची पातळी खोल नसल्याने बळेगाव येथील गोदावरी पात्र अगदी कोरडेच आहे
या भागातील गणेश मंडळाचे पदाधिकारी मंगल मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी जागेची शोध मोहीम चालू केली आहे

0 Comments