Header Ads Widget

वजीरगाव येथे अंत्यविधीच्या कार्यक्रमात आई बापाला विसरू नको रे या गीताने केले भावनिक जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बुचे गायक परबता गुरुजी ढोलकी वादक माधव पवार व संच !!

              माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे वजीरगाव येथील रहिवासी असलेले कै. बापूराव मरीबा वाघमारे यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमात दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी सदरच्या कार्यक्रमात आई बापाला विसरू नको रे मिळणार नाही तुला आई बापाची माया या गीताने येणारे लोक भावनिक झाले आहे 
जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बुचे गायक परबता गुरुजी तसेच पार्टीचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक आणि कवी माधव पवार यांच्या संचानी अंत्यविधीस येणाऱ्या लोकांना भावनिक केले आहे 

तालुक्यातील वजीरगाव जेष्ठ नागरिक कै. बापूराव मरिबा वाघमारे यांचे निधन दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता झाले होते व ते मृत्यू समयी ६५ वर्षाचे होते आणि त्यांच्या अंत्यविधी दिनांक २२ सप्टेंबर रोजी संपन्न झाला आहे 

वजीरगाव येथील जेष्ठ नागरिक कै. बापूराव मरिबा वाघमारे यांच्या अंत्यविधीच्या वेळी जिजाऊ नंदन स्वर संगीत गायान पार्टी रुई बुचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व कवी आणि ढोलकी वादक माधव पवार यांच्यासह हार्मोनियम गणपत पिराजी पवार,पार्टीचे गायक परबता गुरुजी, गायक हणमंत वाघमारे, भिमराव कांबळे आणि संच व सोनू भाऊ वजीरगावकर यावेळी उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments