Header Ads Widget

राज्यातल्या दळभद्री सरकारने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याना हेक्टरी ५० हाजार मदत जाहीर करावी शेतकऱ्याची मागणी !!

            माधव पवार 
गेल्या वर्षाच्या तुलनेत पाहिजे तर या वर्षी निसर्ग राजा शेतकऱ्यावर कोपल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन कापूस व इतर पिके पाण्याविना वाळून जात असल्यामुळे या राज्यातल्या दळभद्री सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी गटातुन करण्यात येत आहे  

शेतकऱ्यानी शेतात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे व कापसाचे पीक घेतले परंतु पाऊसच पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक चुकून व वाळून जात असल्याने व मोठा पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतेत असला तरी या राज्यातल्या सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून पिक विमा व शासनाकडून पिकाची नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहे 

या वर्षी पाऊस पडत नसल्यामुळे नदी नाले व तलाव  विहिरी कोरडेच असल्यामुळे येथे उन्हाळ्यामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे 

या राज्यातल्या दळभद्री सरकारचे लक्ष शेतकऱ्याकडे नसल्यामुळे शेतकऱ्यावर अनेक संकटे निर्माण झाली असून सदरचे सरकार हे पक्ष फोडीच्या बाबतीत तरबेज आहे 

सदरचे सरकार हे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे पंचनामे करून कोरडा दुष्काळ तात्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी गटासह जनसामान्य माणसातून करण्यात येत आहे 

Post a Comment

0 Comments