नांदेड /प्रतिनिधी..योग मित्र परिवार नांदेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेली अपरंपार व केदारगुडा महादेव मंदिर दर्शन तसेच स्नेहभोजनाची सहल उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
श्रावण महिन्यातील रविवारी काढण्यात आलेल्या योग मित्रांच्या सहलीत अनेक योग शाखेतील योग मित्र परिवार सहभागी झाला होता.
आयोजित सहलीसाठी हभप राष्ट्रीय कीर्तनकार गंगाधर गिरोड महाराज, योग शिक्षक सोपानजी कदम, योग शिक्षक रूख्माजी मुदखेडे,योग शिक्षक पंकज आयनेले,योग शिक्षिका मंगलताई कानगुलवार आणि योग शिक्षिका मामीडवारताई यांनी योगासह केदारगुडा महादेव मंदिर तीर्थक्षेत्राची माहिती दिली.
सहल यशस्वी करण्यासाठी बाळकृष्ण पसलवाड, विलासआप्पा कवठेकर, केंद्रे सर, राजू लोखंडे, अनिल राठोड, ओमप्रकाश पोतदार, विनोद कुमार पाटील, भरत मोरे,नारायण करंडे, बालाजी शिंदे, विद्याताई रोकडे, सुवर्णा भोसीकर आणि सिंधुताई ईबीतवार आदी योग साधकांनी मोलाची भूमिका बजावली.
नित्य योग कक्षा सिंचन नगर, नित्य योग कक्षा नाईक नगर आणि नित्य योग कक्षा एसबीआय कॉलनी, आनंद नगर या तिन्ही शाखांमधील असंख्य योग साधक* सहलीमध्ये सहभागी झाले होते. सहलीदरम्यान सर्वांनी एकत्रितपणे महादेवाचे दर्शन, स्नेहभोजन व आनंदाचे क्षण अनुभवले त्यामुळे योग साधकांमध्ये परस्पर स्नेह, आपुलकी आणि बंधुभाव अधिक दृढ झाला.
यावेळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी सहलीला शुभेच्छा देत योग मित्र परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक केले.सर्व योग साधकांचे सहकार्य, कार्यकर्त्यांचे नियोजन आणि मार्गदर्शकांचे मार्गदर्शन यामुळे ही सहल अत्यंत शिस्तबद्ध, आनंददायी आणि संस्मरणीय ठरली.

0 Comments