दिवंगत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे नातू सोहळ्याचे विशेष अतिथी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत नागार्जुना पब्लिक स्कूलचे सचिव केशव गड्डुम यांना हैदराबाद येथे प्रतिष्ठित 'डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इग्नाइटेड माइंड डायरेक्टर्स अवॉर्ड २०२६' प्रदान करण्यात आला आहे एक उपदेश मीडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रैंड कॉन्क्लेव्ह, हैदराबादमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हैदराबाद येथील मेयदान एक्स्पो सेंटर, हायटेक सिटी येथे २१ व २२ ऑगस्ट रोजी हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता.
देशभरातील शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, धोरणकर्ते, शाळांचे मुख्याध्यापक, प्रभावशाली व्यक्ती आणि उद्योगक्षेत्रातील मान्यवर या कॉन्क्लेव्ह मध्ये सहभागी झाले. शिक्षण क्षेत्रातील बदलत्या गरजा, प्रशिक्षण, शैक्षणिक मार्गदर्शन, आणि जागतिक समुपदेशन स्तरावरील नेटवर्किंग यासाठी हे व्यासपीठ महत्त्वपूर्ण ठरले आहे
या सोहळ्याला दिवंगत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे नातू डॉ. सुब्रमण्यम शर्माची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती.
दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोज शनिवार रोजी केशव गड्डुम यांना हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला भारत सरकार तसेच टाइम्स फाउंडेशन (टाइम्स ऑफ इंडिया समूहाचा भाग) यांचे सहकार्य असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
---------------------------------------------------------------
|| शाळेचा विशेष सन्मान ||
---------------------------------------------------------------
केशव गड्डूम यांच्या या गौरवामुळे नागार्जुना पब्लिक स्कूलच्या शैक्षणिक वाटचालीला आणि त्यांच्या नेतृत्वाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. संस्थेच्या अध्यक्षा सौ. शैला पवार तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केशव गड्डुम यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

0 Comments