नायगावच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे जल जीवन मशीन हर घर जल योजनेमुळे गेल्या दोन ते तीन पासून गावातील झालेला विकास व काँक्रीट रस्ते या योजने मुळे खोदून ठेवले असल्यामुळे योजनेच्या नावाखाली गावाचा विकास झाला भकास म्हणण्याची वेळ नागरिकावर आली आहे
नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी गावा गावात पाणी पुरवठा योजनेचे कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित गुत्तेदाराला व ग्रामपंचायतीला सूचना करतील का ? असा प्रश्न चर्चेला जात आहे
पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्या कडून नाही चौकशी केली जाते ना गुत्तेदाराना काम करण्यासाठी सूचना दिल्या जात नसल्यामुळे सदरच्या जल जीवन मधीन अंतर्गत हर घर नळ पाणी पुरवठा योजनेचे काम अध्याप अर्धवट अवस्थेत आहे
सदरच्या पाणी पुरवठा योजनेची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या कडून चौकशी होण्याची गरज आहे
खेड्यातील योजने काम पूर्ण झाले नसल्यामुळे अनेक खेड्या पाड्यात नागरिकांना पावसाळ्यात रस्त्याने जाता येत नाही व पाणी पुरवठ्याचे काम ही होत नाही सदरच्या योजनेचे आलेले पैसे गेले कुठे असा प्रश्न जन सामान्य माणसाला भेडसावत आहे
तालुक्यातील खेड्या पाड्यातील गावचे सरपंच व ग्रामसेवक यांची पूर्ण पणे पाणी पुरवठ्याचे काम पूर्ण करण्याची इच्छा असली तरी ज्या निष्क्रिय गुतदाराकडे काम देण्यात आले ते गुत्तेदार काम करण्यासाठी काम चुकार पणा करत असल्यामुळे यांची चौकशी होणे गरजेचे आहे
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग नायागांव अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे की संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाच्या सरपंच व ग्रामसेवकाच्या निष्काळजी पणामुळे सदरचे काम रखडले किंवा गुत्तेदाराच्या हलगर्जी पणामुळे सदरचे काम थांबविण्यात आले का यांची चौकशी करण्याची अत्यंत गरज आहे

0 Comments