Header Ads Widget

बिलोलीच्या दारू बंदी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात अवैध देशी दारू विक्री याला दारूबंदी अधिकारी व कर्मचारी जबाबदार ? -

           माधव पवार 
ग्रामीण भागात अवैध देशी दारू खेड्यापाड्यात विक्री होत असताना सुद्धा बिलोलीचे दारूबंदी अधिकारी व कर्मचारी यांनी दर महिन्याच्या हप्त्याच्या लालची पोटी अशा अवैध देशी दारू विक्रीला प्रोत्साहन देतात खरे तर बिलोलीच्या दारू बंदी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने खेड्यापाड्यात वेग देशी दारू विक्री केली जात आहे 
अवैध देशी दारू बंद करण्याचे काम दारू बंदी अधिकाऱ्याचे असताना सुद्धा --मूग गिळून गप्प ? 
खेड्यापाड्यात अवैध देशी दारू विक्री होत असताना बिलोलीचे दारूबंदी अधिकारी हे झोपेचे सोंग घेऊन बसत असल्यामुळे त्यांना दारु बंद करण्यासाठी वेळ मिळत नाही की हप्त्याच्या लालसा पोटी दुर्लक्ष करतात हा महत्त्वाचा प्रश्न चर्चेला जात आहे 
अवैध देशी दारू बंद करण्यासाठी शासनाने स्पेशल बिलोली येथे दारूबंदी अधिकाऱ्यांचे कार्यालय असताना सुद्धा येथील अधिकारी व कर्मचारी यांना सदरची माहिती असताना देशी दारूचा उत्त आला असताना सुद्धा खेड्यापाड्यात येऊन अवैध देशी दारू बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

संबंधित पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलिसांच्या नजरा चुकून अवैध देशी दारू विक्री होत असल्यामुळे अनेक वेळा संबंधित पोलीस ठाणे प्रमुखानी व बीट जमादारानी कारवाई करुन सुद्धा संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखावर व कर्मचाऱ्यावर खापर फोडले जाते आहे 

परंतु बिलोलीचे दारू बंदी अधिकारी यांनी आज पर्यंतच्या कार्यकाळात अवैध देशी दारू बंद करण्यासाठी कोणते प्रयत्न केले व किती करावाह्य केल्या हे स्पष्ट पणे जनते समोर सांगतील का ? असा महत्त्वाचा प्रश्न चर्चेला जात आहे 

बिलोलीचे दारूबंदी अधिकारी हे नावा पुरतेच उरले असल्यामुळे व दर महिन्याला खाजगी वाहनात येऊन महिना टू महिना आपले हप्ते वसुली करून घेऊन जात आहेत 

या दारूबंदी अधिकाऱ्याच्या आशीर्वादानेच खेड्यापाड्यात अवैध देशी दारू विकली जाते हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज भासत आहे 

Post a Comment

0 Comments