हिमायतनगर येथुन जवळच असलेल्या हदगाव तालुक्यातील कोहळि येथे हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून कोहळी, ता. हदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिरास नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे
या शिबिरामध्ये एकूण ६६८ रुग्णांची OPD तपासणी करण्यात आली. त्यापैकी २१८ रुग्णांना पुढील विशेष उपचारांसाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे), वर्धा येथे पाठविण्यात येणार आहे.
या प्रसंगी महादेव मठ संस्थान, हदगावचे श्री. ष. ब्र. १०८ शिवचैतन्य शिवाचार्य महाराज, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुरमुरे सर, निर्मल हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल आढाव सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.तसेच हे शिबिर यशस्वी करण्यासाठी दत्ता मेघे हॉस्पिटल नागपुरची संपूर्ण वैद्यकीय टीम, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी, आशा सेविका, तसेच शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले.
या शिबिरामुळे ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी व उपचाराचा लाभ मिळाला. नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत आमदार बाबुराव कदम कोहळीकर साहेब यांच्या जनसेवेच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले व आभार व्यक्त केले आहे.

0 Comments