Header Ads Widget

महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यासह तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे व तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवांगत आर आर पाटील अशा नेतृत्वाच्या राज्यकर्त्यांची महाराष्ट्राला अत्यंत गरज !!

      माधव पवार 
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यासह तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे व तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवांगत आर आर पाटील अशा नेतृत्वाच्या राज्यकर्त्यांची महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे 

राज्याचे तत्कालीन माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यासह तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांनी महाराष्ट्र घडविण्यासाठी व राज्याचा विकास करण्यासाठी पक्ष कोणता ही त्यांच्या माध्यमातून प्रमाणिक पणे विकास करून दाखविला आहे 

या महाराष्ट्र राज्याला अशा सुजळ नेतृत्वाच्या मुख्यमंत्र्याची व उपमुख्यमंत्र्याची मोठया प्रमाणात आवश्यकता असून सध्याचे राजकारण पाहिले तर सर्व राजकारण राज्यात ढवळून निघाले आहे 

राज्यात व केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे सर्वत्र देशात महागाईचा भडका उडाला आहे 

या देशात व राज्यात नाही गोरगरीब जनतेला न्याय मिळतो तर शेतकऱ्यांच्या शेतातील मालाला भाव सुद्धा मिळत नाही कोणत्या मागणीसाठी रास्ता रोको व कोणत्या महत्वाच्या मागणीसाठी उपोषण व आंदोलन केले तर त्यांच्यावर पोलिसांच्या लाट्या पडत आहेत 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी फोडा फोडीचे राजकारण करून आपली राज्यातली सत्ता मजबूत करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आहे 

अशामुळे या महाराष्ट्रा मध्ये दररोज होत असलेला खेळ खंडोबा जग डोळ्यांनी पाहत आहे 

Post a Comment

0 Comments