हिमायतनगर : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २६ जुलै रोजी झालेल्या संचालक मंडळ निवडणुकीत हिमायतनगर गटात दुरंगी लढत रंगली असली, तरी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार तथा माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची बाजू भक्कम असल्याचा विश्वास हदगाव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक, सवना ज सोसायटी चे चेअरमन, सरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून माधवराव पाटील जवळगावकर यांनी राजकारण करित असताना सहकार क्षेत्रात सातत्याने काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांसाठी स्वतः पदाची अपेक्षा न ठेवता कार्यकर्ते, शेतकरी व सभासदांच्या विविध प्रश्नांसाठी पुढाकार घेतला आहे. सत्ता असो अथवा नसो, सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी कायम संपर्क ठेवून त्यांना बळ देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे हिमायतनगर गटातील मतदारांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाचे वातावरण असल्याचे परमेश्वर गोपतवाड यांनी सांगितले.
हिमायतनगर गटातील बँकेचे मतदार विकासाभिमुख नेतृत्वाला प्राधान्य देणारे असून, जवळगावकर यांच्या कार्याचा विचार करून मोठ्या मताधिक्याने त्यांना पाठिंबा दिला असल्याने त्यांचा विजय काळ्या दगडावरची रेघ आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या विजयासाठी समर्थकांनी नियोजनबद्ध संपर्क मोहीम ठेवली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलला जिल्हाभर चांगला प्रतिसाद मिळत असून, हिमायतनगर गटातून माधवराव पाटील जवळगावकर यांच्या विजयाची निश्चीतच नोंद होईल, असा आशावाद प्रमेश्वर. गोपतवाड यांनी व्यक्त केला आहे.

0 Comments