Header Ads Widget

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्यातील संगतीला अभिप्रेत असलेल्या घुंगराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाच चिटणीस वसंत पाटील सुगावे यांचे उत्कृष्ट आयोजन !!

      माधव पवार 
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्यातील संगतीला अभिप्रेत असलेल्या घुंगराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाच चिटणीस वसंत पाटील सुगावे यांचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आहे 

नांदेड जिल्हाच्या नायगाव तालुक्यातील मौजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जन विश्वास सप्ताह या कार्यक्रमाचे राज्यभरात सामाजिक उपक्रम घेऊन अजितदादांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी साजरी केली आहे
  
दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंती सोहळ्याच्या अनुषणगांने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्या वतीने ग्रामीण भागातील वीज समस्यां सोडविण्यासाठी वीज समस्या निवारण मेळावा या लोक उपोयगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 
   
तालुक्यातील घुंगराळा येथील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पा.होटाळकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे कार्यकारी अभियंता पेंढारकर उपअभियंता पाटील कनिष्ठ अभियंता जाधव यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
    
या मेळाव्यात उपस्थित लोकप्रतिनिधी सरपंच शेतकरी उद्योजक यांच्याकडून विजेच्या संदर्भातील अडी अडचणी समस्या तक्रारी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी तोंडी स्वरूपात जाणून घेतल्या आहेत 

यामध्ये प्रामुख्याने डीपी दुरुस्ती, नवीन डीपी बसविणे, नवीन पोल बसविणे, देखभाल दुरुस्ती,लोडशेडिंगचे वेळापत्रक याबाबत उपस्थित नागरिक आणि अधिकारी यांच्यात चर्चा करण्यात आली त्यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी तात्काळ ही कामे मार्गी लावून लवकरात सर्व कामे पूर्ण करू असे आश्वासन दिले आहे 

तसेच महावितरणच्या सौर ऊर्जा,व इतर योजनांबद्दल अधिकाऱ्यांनी विस्तृतपणे माहिती देऊन मार्गदर्शन केले.

सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक वसंत सुगावे पाटील यांनी केले यावेळी वसंत सुगावे यांनी अजितदादांच्या कार्याची माहिती देत शेतकरी, व तळागाळातील लोकांसाठी काम करणारे असे अजितदादा यांचे नेतृत्व होते यांनी याच भावनेने अजीतदादा यांना अभिवादन करण्यासाठी या समाजउपोयगी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे आपल्या प्रास्तविकातून सांगितले यावेळी अधीक्षक अभियंता खंडारे साहेब यांनी सर्व तक्रारांची दखल घेत सर्व कामे तात्काळ करू, तसेच महावितरणच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली ज्या ठिकाणी कर्मचारी कमी आहेत त्या ठिकाणी नवीन व अधिकचे कर्मचारी यांच्या नेमणूक करू ,नवीन डीपी, डीपी दुरुस्ती ही कामे प्रामुख्याने लवकरात लवकर करणार असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्षीय समारोपात शिवराज पा.होटाळकर  या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन करून ग्रामीण भागातील वीज समस्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ सोडवाव्यात जेणेकरून ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत राहील या करिता महावीतरण ने सर्वोत्तपरी नागरिकांना सहकार्य करावे असे आपल्या मनोगतात सांगितले.

या कार्यक्रमात आयोजक वसंत सुगावे पाटील यांच्या वतीने उपस्थित असणाऱ्या विविध गावाच्या *सरपंचांना अजितदादा पवार यांच्या प्रतिमा ग्रामपंचायत कार्यालयात* लावण्यासाठी भेट देण्यात आल्या.या वेळी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष श्री विश्वनाथ बडुरे सर, माजी पंचायत समिती सदस्य प्ररबता 

पा.जाधव, कृष्णुरचे सरपंच प्रशांत पा नांदरे, सावरखेड चे उपसरपंच संतोष पा.वानखेडे, शिवाजी पा.ढगे, मांडणीचे सरपंच सूर्यभान डुबुकवाड, व उपसरपंच गोविंद पा ताटे, तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब पा.ताटे, माजी सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती कुंटूरचे  हानमंतराव पांडे, मनुरचे सरपंच नामदेव 

पा.शिंदे,निळेगव्हाणचे उपसरपंच गोविंदराव कामाजी पा. जाधव, सेवा सहकारी सोसायटी सदस्य वजीरगावचे कोंडीबा दत्तराम पा . ढगे राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद पा हेडगे, नायगाव तालुका सोशल मीडिया अध्यक्ष सटवाजी मामा मोदलवाड,कहाळा बु चे माजी उपसरपंच किशन निवृत्ती नुकुलवाड, रुईचे 

बु.सरपंच निलेश देशमुख, आंतर गावचे सरपंच गजानन पा.शिंदे, बळवंत (मोदी) शिंदे बालाजी पा.शिंदे, संदीप पा कदम सोमठाणकर, कुष्णुर चे पोलीस पाटील आशोक पा जाधव, गंगाधर (बापु) अरविंद पा.जाधव, साहेबराव पा.जाधव पांडु पा.जाधव, रावसाहेब पा.जाधव,यादव गजभारे, माजी विस्तार अधिकारी नागोराव दंडेवाड साहेब, सेवा सहकारी सोसायटी 

घुंगराळाचे चेअरमन श्री श्याम यमलवाड, अच्युतराव पो पा ‌ढगे,माजी ग्रामपंचायत सदस्य बालाजी हाळदेवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य मुरहरी तुरटवाड, बालाजी मातावाड साहेब, घुंगराळ्याचे तंटामुक्ती अध्यक्ष श्याम पा.ढगे,माजी उपसरपंच शिवाजी पा.ढगे,,राम पा.सुगावे, मारोती आलगटलेवार, विलास पा सुगावे, गजानन जलदेवार,गणेश सुकेंवार, खंडु पा.ढगे, राजेश पा.ढगे,आदी उपस्थित होते.

या वेळी मान्यवरांकडुन व नागरिकांकडून वसंत सुगावे पाटील यांच कौतुक करण्यात आले 
या कार्यक्रमास कृष्णूर,कहळा,रुई,आंतरगाव, बरबडा, निळेगव्हाण,सावरखेड,पाटोदा,
गंगणबीड,इज्जतगाव,मनूर या सह अनेक गावचे शेतकरी,गावकरी म उपस्थित होते .


Post a Comment

0 Comments