नांदेड/प्रतिनिधी..दीपक नगर तरोडा बुद्रुक भागातील श्रीनिकेतन प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्त मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस.एन.राऊत यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी महोत्सव उत्सवात साजरा करण्यात आला आहे
आयोजित कार्यक्रमात शाळेतील बहुतांश विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत टाळ चिपळ्यासह उपस्थित झाले होते. टाळांच्या गजरात विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात काढलेली वारकऱ्यांची दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती
अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन विठ्ठल व रुक्मिणीच्या वेशभूषेत उपस्थित झालेले विद्यार्थी विठ्ठल नामाच्या गजरात शाळा परिसर भक्तीमय झाला होता यावेळी विठ्ठलाचा महिमा व वारकऱ्यांच्या भक्ती बाबत मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस.एन.राऊत माहिती सांगून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विठ्ठल नामाच्या गजरात सहागी होऊन विठ्ठलाची आरती म्हणून प्रोत्साहन दिल्या आहेत
कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक अविनाश इंगोले, बाळकृष्ण राठोड, श्रीधर पवार, सुदर्शन कल्याणकर, गतीश मगरे ,सौ. सुरेखा मरशिवणे , सौ.वर्षाराणी कोरे यांनी परिश्रम घेतला.यावेळी विद्यार्थी.पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments