Header Ads Widget

जिल्ह्याचे लाडके खासदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांचे काका श्रीनिवास पाटील चव्हाण यांची नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी निवड अभिनंदनचा वर्षाव !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन खासदार दिवंगत वसंतराव पाटील चव्हाण यांचे स्वन पूर्ण करण्यासाठी जिल्हाचे लाडके खासदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांनी आपल्या लाडक्या काकासाठी म्हणजे श्रीनिवास पाटील चव्हाण यांना नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदावर नेण्यासाठी मोठे प्रयत्न केले असल्यामुळे त्यांची संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे 

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी श्रीनिवास पाटील चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली असल्यामुळे त्यांच्यावर राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव करण्यात येत आहे 

खरे तर राजकीय पुढार्‍याचा नादच करायचा नाही आणि या राजकीय पक्षांच्या राजकीय पुढार्‍याच्या संदर्भात गावागावात राजकारण करून गटागटातवाद विवाद करून घेण्यापेक्षा राजकीय पुढारी जसे वेळे नुसार रंग बदलतात तशाच पद्धतीने खेड्यापाड्यात एक कॉप्याने राहण्यासाठी सर्वानी मनमिळाऊ पणे वागणे व राहणे गरजेचे आहे 

यावेळी नायगाव तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले काँग्रेस पक्षाचे माजी महिला सरपंच प्रतिनिधी गजानन भुजंगराव पाटील शिंदे नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामपंचायत सदस्य माधव व्यंकटराव गंगातीरे अमोल पांडे शिवानंद शिंदे यांनी नवनिर्वाचित संचालकाचा शुभेच्छा देऊन भव्य सत्कार केला आहे 

Post a Comment

0 Comments